loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणसाठी धावणार ४ वातानुकूलित विशेष रेल्वे

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) - प्रवाशांच्या उन्हाळी हंगामातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मडगावदरम्यान धावतील. गाडी क्र. ०११२९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव वातानुकूलित विशेष ही गाडी १० आणि १४ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल व मडगाव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०११३० मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष ही गाडी मडगाव येथून १० आणि १४ एप्रिलला १६.०० वाजता सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी, असे थांबे असतील. १८ वातानुकूलित ३- टायर इकॉनॉमी डबे व २ जनरेटर व्हॅन असतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg