loader
Breaking News
Breaking News
Foto

पत्नीने पतीला मारहाण करून दिली ठार मारण्याची धमकी; मुलाकडूनही मारहाण : गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील अलसुरे येथे आपल्या पत्नीला भावकीने दिलेली नोटीस बजावण्यासाठी आलेल्या पतीलाच मारहाण करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पत्नीविरोधात तसेच या झटापटीत वडिलांना मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात व अन्य एक अशा तिघांविरोधात येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिपीन बाबुराव शिर्के (४५, रा. कुसगाव-बौद्धवाडी, ता. महाड, जि. रायगड) हे आपली पत्नी नयना बिपीन शिर्के हिला आपल्या भावकीने बजावलेली नोटीस देण्यासाठी अलसुरे येथे आले होते. त्यावेळी त्यांना पत्नी नयना हिने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांचा मुलगा मंथन बिपीन शिर्के व बाणा सर्वरा यांनीही त्यांना मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या बिपीन बाबुराव शिर्के (महाड) यांनी येथील पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नी नयना बिपीन शिर्के, मुलगा मंथन बिपीन शिर्के व बाणा सर्वरा (तिघेही रा. अलसुरे, ता. खेड) यांच्याविरोधात गु.र.नं. ८८/२०२६ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१),३५१(३),३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg