सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग सुपुत्र प्रसिद्ध नाटककार कवी प्रा.सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृह 12 एप्रिल रोजी सायं.5 वा. आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड.निरवडेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घघाटन होणार असून उद्घघाटन सत्रात सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या लेखन आणि कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तर दुसऱ्यासत्रात निमंत्रित कवींचे कवी संमेलनही आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे प्रमुख मधुकर मातोंडकर आणि विठ्ठल कदम यांनी दिली.
ज्येष्ठ कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाला ज्येष्ठ कवी वीरधवल परब यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. तर यावेळी प्रमुख उपस्थिती सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. एस एन.पाटील यांची लाभणार आहे. ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांना यावेळी नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे लेखन पुरस्कार तर सांस्कृतिक सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांना नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ कवी अरुण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात डॉ. शरयु आसोलकर प्रा.मोहन कुंभार, प्रमिता तांबे, कल्पना बांदेकर, श्वेतल परब, नीलम यादव, मनीषा पाटील, प्रा.सुचिता गायकवाड, त्ररतुजा सावंत भोसले, प्रज्ञा मातोंडकर, शालिनी मोहाळे, स्नेहल फणसळकर, मनोहर परब, किशोर वालावलकर, प्रकाश तेंडुलकर, संतोष वालावलकर, राजेश कदम, दिपक पटेकर, मनीषा जाधव, एकनाथ कांबळे, राजा ठाकर, आर्या बागवे, सत्यवान साटम, रुपेश पाटील, नंदा चव्हाण, हरिश्चंद्र भिसे, रामचंद्र शिरोडकर, सुरेश पवार, मनोहर सरमळकर, मधुकर जाधव, प्रगती पाताडे, अनुष्का रेवणकर, योगिता शेटकर, किशोर कदम,प्रा.दर्शना पाताडे, संचिता चव्हाण, संतोष तुळसणकर, रीमा भोसले, प्रियदर्शनी पारकर, दीपक तळवडेकर, सायली नारकर, मालिनी लाड, नैतिक मोरजकर, अक्षदा गावडे, सेलेस्तीन शिरोडकर आदी कवींचे कविता वाचन होणार आहे. सिद्धार्थ विष्णू तांबे हे नाटककार आणि कवी म्हणून मराठी साहित्यात प्रसिद्ध आहेत. कणकवली शिरवल येथील असलेले सिद्धार्थ विष्णू तांबे हे वसई अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.' जाता नाही जात ' हे त्यांचे गाजलेले नाटक. त्यांची 'आंबेडकर चौक ' ही बहुचर्चित कविता. दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता आंबेडकर चौक या शीर्षकाने त्यांच्या मित्रमंडळींतर्फे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ यावर्षीपासून साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन श्री मातोंडकर आणि श्री कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो- 98230 48126 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)













































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.