खेड (प्रतिनिधी) - दापोली येथील श्री मंगल कार्यालयात आज रायगड लोकसभा संपर्कप्रमुख अनिल नवघणे व जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या वेळी माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, रायगड लोकसभा संपर्कप्रमुख अनिल नवघणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरभाई देसाई, पंचायत समिती सभापती उन्मेष राजे तसेच तालुका संघटक प्रकाश कालेकर यांनी मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मतदार नोंदणी, दुरुस्ती, नाव वगळणे आणि नव्या मतदारांचा समावेश यासंदर्भातील महत्त्वाच्या बाबींची माहिती देत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले. शिबिरादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मतदार यादी पुनर्निरीक्षणाशी संबंधित विविध अडचणी व प्रश्न मांडले. या सर्व समस्यांचे समाधान माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे यांनी समर्पक मार्गदर्शन करून केले.
या कार्यक्रमास माजी अध्यक्ष संजय कांगणे, उपसभापती नम्रता तोडणकर, उपजिल्हा संघटिका रोहिणीताई दळवी, नगराध्यक्षा कृपा घाग, मधुकर दळवी, तालुका संघटिका दीप्ती निखार्गे, युवासेना उपजिल्हाधिकारी अमित पारदुले, शहर प्रमुख पप्पू रेळेकर यांच्यासह तालुका मुख्य कार्यकारिणी पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, वार्ड शाखाप्रमुख, बी.एल.ए., सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी शिवसैनिक, युवासेना व महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवासेना तालुका अध्यक्ष सुमित जाधव यांनी केले.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.