loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे जंगलवाडी येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा पाचवा वर्धापन दिन १५ एप्रिल रोजी

देवळे (प्रकाश चाळके) -संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथील प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होणारा या गावाचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिराचा पाचवा वर्धापन दिन चैत्र कृष्ण त्रयोदशी( शिवरात्री) दि.१५ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे. या उत्सवानिमित्त मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ठीक ८.०० वाजल्यापासून मंत्र, जप, अभिषेक, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, स्थानिक भजने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ देवळे - जंगलवाडी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन श्री देवी कालेश्वरी - रवळनाथ मंदिर ट्रस्ट देवळे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg