रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर मित्राच्या मृत्यूला अपघाताचे स्वरूप दर्शवत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीचे बिंग पोलिस तपासात फुटले असून देवरूख पोलिसांनी अतिशय चाणाक्षपणे तपास करत आरोपीला अटक केली आहे. आशिष शांताराम भावके (वय २७) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याची रवानगी ५ दिवसांसाठी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला मित्र गाडीतून उतरला आणि पडला अशी खोटी माहिती देणारा तक्रारदारच अखेर खुनी निष्पन्न झाला आहे.
या चक्रावणार्या घटनेविषयी पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार अधिक वृत्त असे की, सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुधीर अर्जुन यादव (वय ३०) आणि आशिष शांताराम भावके हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक व मित्र होते. हे दोघेही रत्नागिरी येथील आरेवारे येथे पर्यटनासाठी फिरण्यासाठी आले होते. तेथे त्यांनी मद्यपान आणि जेवण केले. परतीच्या प्रवासाला निघाले असताना ३१ मार्च २०२६ रोजी रात्री २३.३० च्या सुमारास महामार्गावरील मौजे दख्खन गावच्या हद्दीत दोघांमध्ये दारूवरून वाद झाला. मयत सुधीरने आणखी दारू पाहिजे या हट्टापायी आशिषच्या एर्टिगा कारच्या बोनेटवर बसून काच फोडली. याचा राग आल्याने आशिषने सुधीर बोनेटवर असतानाच गाडी चालवली, ज्यामुळे सुधीर खाली पडला आणि गंभीर जखमी झाला.
आरोपीने त्याला त्याच अवस्थेत सोडून पळ काढला होता. सुरुवातीला आशिषने पोलिसांना माहिती दिली होती की, सुधीर गाडीतून पडल्यामुळे जखमी झाला आहे. मात्र, देवरुख पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (॒ऊ छे. १२/२०२६) सखोल चौकशी केली असता, आशिषने सुधीरला जाणीवपूर्वक मृत्यूच्या खाईत ढकलल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद अनंत वाघाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशिष भावके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तपास केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.











































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.