ठाणे (प्रतिनिधी): ठाणे शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नौपाडा येथील एका बांधकाम स्थळावर एका सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या 45 वर्षीय नराधम मजुराला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे बांधकाम स्थळावरील महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सोमवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी 7.45 ते 8.15 दरम्यान ठाणे शहराच्या नौपाडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी रामलड्डू यादव (वय ४५) या मजुराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत आरोपीला जेरबंद केले. संबंधित बांधकाम स्थळावर पीडित मुलीचे आई-वडील मजुरीचे काम करतात. आरोपी देखील त्याच ठिकाणी काम करत होता. सोमवारी संध्याकाळी संधी साधून आरोपीने पीडितीवर अत्याचात केला. या धक्कादायक प्रसंगामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने रडत रडत आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला.
अत्याचार करणारा आरोपी हा पीडितेच्या वडिलांच्या ओळखीतील असल्याने तिने आपल्यावर अत्याचार करणाऱ्याची तिच्या वडिलांना माहिती दिली. त्याच भागात मजुरी करणाऱ्या या पित्याने नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून नौपाडा पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि आरोपीला अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यातील विविध कलमान्वये ७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी शिंदेसेनेने केली आहे.















































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.