loader
Breaking News
Breaking News
Foto

महावितरणच्या कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे सभा संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) - महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे सभा संपन्न झाली. 1 एप्रिलपासून काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. त्यांना पुन्हा कामावर कसे हजर करता येईल, या संदर्भात यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. कंत्राटी कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. काम करत असताना ग्राहकांना तुमच्या कामातून चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजेत. तुमच्या कामातून त्यांना समाधान मिळाले पाहिजे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चांगल्या प्रकारे सेवा देत असताना आपलं काम जोखमीचे असल्याकारणाने आपण कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता डोकं शांत ठेवून काम करावे. कामगारांना भविष्यात काही अडचणी आल्यास आपण ठामपणे कामगारांच्या पाठीशी राहू असे मत वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. तर संघटनेसाठी कामगारांचे हित सर्वप्रथम असेल. त्यासाठी संघटनेवर विश्वास ठेवून एकजुटीची वज्रमुठ कायम ठेवूया व कामगार हित जपूया असे संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी अध्यक्षीय भाषणातून यावेळी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून अशोक सावंत, जयेंद्र रावराणे केंद्रीय कार्यकारणी सचिव आनंद लाड,आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg