loader
Breaking News
Breaking News
Foto

फोंडाघाट हरकुळ येथील युवकाचा भीषण अपघातात मृत्यू

मालवण (प्रतिनिधी) - मोटरसायकल वरून मालवणात फिरायला आलेल्या फोंडाघाट हरकुळ येथील युवकाचा मालवणहून फोंडाघाट येथे परतीच्या प्रवासात ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीला मोटर सायकलने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ओंकार चव्हाण याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सावरवाड पोलिसांच्या चेक पोस्ट नजीकच्या वळणावर घडली आहे. या अपघातात मोटरसायकल वरील दुसरा सहकारी सुदेश सापळे हा ही किरकोळ जखमी झाला असून स्विफ्ट डिझायर कारमधील चालकही किरकोळ जखमी झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फोंडाघाट हरकुळ येथील हे दोन युवक आपल्याकडील यामाहा कंपनीची स्पोर्ट्स बाईक (MH04 JX 7091) घेऊन आपल्या अन्य सहकाऱ्यांसह ४ ते ५ बाईक घेऊन मालवणात फिरायला आले होते. अपघातग्रस्त बाईक सुदेश सापळे याची होती. मालवणात फिरून झाल्यानंतर ते माघारी जात असताना सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास सावरवाड चेकपोस्ट नजीकच्या वळणावर दुसऱ्या सहकाऱ्याच्या दुचाकीला ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक समोरून येणाऱ्या लातूर पासिंगच्या डिझायर गाडीला बसली. या अपघातात ओंकार चव्हाण याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर सुदेश सापळे याच्यासह डिझायर गाडीच्या चालकाला दुखापत झाली. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरु होता.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg