सावंतवाडी (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 'भाजपा ध्वज वाटप अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालयात करण्यात आला. ६ एप्रिल रोजी होणाऱ्या भाजपा स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या घरावर, मंडल, बूथ आणि शक्ती केंद्र कार्यालयांवर हजारोंच्या संख्येने पक्षाचे ध्वज फडकवले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर, आज विशाल परब यांच्या हस्ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अधिकृत ध्वजांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले की, "स्थापना दिनानिमित्त मतदारसंघातील हजारो घरांवर भाजपाचे ध्वज फडकणार असून संपूर्ण वातावरण भाजपामय होणार आहे." जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपाचा वर्धापन दिन कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांसाठी अभिमानाचा सोहळा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमाला भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या सोमवारी होणाऱ्या मुख्य सोहळ्याचा उत्साह आजच्या या ध्वज वाटप कार्यक्रमात स्पष्टपणे दिसून येत होता.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.