loader
Breaking News
Breaking News
Foto

आम. किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत लांज्यात भव्य मिनी शूटींग व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - जाणता राजा ग्रुप लांजा आयोजित व आमदार किरण सामंत पुरस्कृत भव्य मिनी शूटींग व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 लांजा येथे नुकत्याच आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमाला आमदार कीरण सामंत, नगराध्यक्षा सावली कुरूप, नगरसेविका वंदना काटगाळकर, सांगली जिल्हा मुद्रांक प्रमोद कदम, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक मुन्ना खामकर, माजी नगरसेवक प्रसाद डोर्ले, जेष्ठ खेळाडू विद्यार्जन कामत, सुधाकर पत्की, मकरंद लिंगायत, जाणता राजाचे सर्व शिलेदार आदीसह क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 29 संघानी सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता - आर.बी.बॉईज सावर्डे. 15555/-रुपये आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक विजेता -महालक्ष्मी चिपळूण. 11111/-रुपये, आकर्षक चषक, तृतीय क्रमांक विजेता -एस.एम.चिपळूण.7777/- रुपये आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक विजेता दत्तप्रासादिक घुढेवठार. 3333/- रुपये, आकर्षक चषक, उत्कृष्ट नेटमन-अजय वास्तर, महालक्ष्मी चिपळूण, रोख रुपये 500/- व आकर्षक चषक, उत्कृष्ट शूटर व डीगर -रुजान बोंबल, आर बी बॉईज, सावर्डे रोख रुपये 500/- +500/- व दोन आकर्षक चषक बक्षिसे देऊन आमदार किरण सामंत यांचे हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेचे सुत्रसंचलन मकरंद लिंगायत यानी तर समालोचन संदीप मयेकर यांनी केले.

टाईम्स स्पेशल

स्पर्धा यशस्वीतेसाठी संजय चव्हाण, मंगेश लांजेकर, संदीप कुमार, किशोर कांबळे, भीमराव कांबळे, राज शेट्ये, राजा लांजेकर, समीर शेट्ये, गणेश शेट्ये, प्रकाश पांचाळ, सौरभ चव्हाण, दीलीप जाधव, किरण कांबळे, कारी पाटील, डाॅ.धालवलकर, दीपक कामत, संतोष हांदे आदीं विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg