loader
Breaking News
Breaking News
Foto

अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या चौघांवर पोलिसांची कारवाई

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील नौपाडा पोलिसांनी दोन नशेडीवर तर मुंब्रा आणि ठाणेनगर पोलिसांनी प्रत्येकी एक अशा चार जणांवर एकाच दिवशी कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बी केबीन रेल्वे पफर्कीग गौतमवाडी नौपाडा ठाणे या ठिकाणी भिंतीचे बाजुला अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या संशयित भिमा भानुदास दुसंगे(५४) रा. वागळे आणि संशयित रोहीत महेश बलवानी(३०) रा. मुलुंड मुंबई यांच्यावर अंमली पदार्थ सेवन करताना आढळल्याने नौपाडा पोलीस गस्ती पथकाने कारवाई करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तर मुंब्रा पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाला आढळलेल्या संशयित जुनेद जुम्मा खान(२१) रा, अमृतनगर, हा मुंब्रा पोलीस स्टेशनचे हद्दीत छोटुच्या पार्कीगमध्ये रिक्षाच्या आडोशाला, नुर हाईट्स समोर, अमर गार्डन, मुंब्रा बायपास रोड, वाय जंक्शन येथे गांजाचे सेवन करताना आढळला. तर ठाणे नगर पोलिसांच्या गस्ती पथकाला एस.टी. स्टैंड समोर, ठाणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 2 च्या बाजुला, स्टेशन रोड, ठाणे (प) येथे सार्वजनिक ठिकाणी बसुन गांजा अंमली पदार्थ सेवन करताना पोलिसांनी अटक करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg