loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळंब शाळा नं.३ मध्ये कामगिरी शिक्षक मिळण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळंब नं.३ मध्ये पर्यायी शिक्षक किंवा कामगिरी शिक्षक मिळण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती गुहागर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शाळा वेळंब नं.३ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून पटसंख्या १२ इतके आहे या शाळेतील शिक्षक महादेव बंडाप्पा नरोणे यांना दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी शाळा व्यवस्थापन पाहण्यासाठी जिल्हा परिषद शाळा चिखली नं.२ या शाळेत कामगिरी शिक्षक काढले असल्याने आमच्या शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आमच्या शाळेला पर्यायी शिक्षक किंवा कामगिरी शिक्षक तातडीने मिळावा अशी विनंती आहे. या संदर्भामध्ये शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने सुद्धा केलेल्या ठरावा द्वारे पर्यायी शिक्षकाची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर रुपेश किर्वे, पूर्वी पिंपळकर, कोमल राऊत, दीपक नांदलस्कर, प्रसाद नांदलस्कर, महेश माळी, प्रकाश माळी, सचिन राऊत यांच्या सह्या आहेत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव देखील देण्यात आलेला आहे. तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तातडीने पर्यायी शिक्षक किंवा कामगिरी शिक्षक या शाळेला द्यावा अशी विनंती शेवटी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg