मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रामध्ये व किनाऱ्यालगत महसूल विभाग आणि बंदर विभाग यांच्या पथकामार्फत करण्यात आलेल्या संयुक्त पाहणीत कालावल खाडीतील बंडा बेटा नजीक वाळूने भरलेल्या तीन होड्या व शेरे जमिनीत असलेला वाळू साठा ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच रेवंडी स्मशानभूमी, गावकरवाडी वायांगणी सडयेवाडी, तेरई, भगवंतगड, तोंडवळी करंजेवाडी तोंडवळी मधलीवाडी येथे आढळून आलेले वाळू किनाऱ्यावर उतरविण्यासाठी वापरले जाणारे दगडी व लोखंडी रॅम्प नष्ट करून टाकण्याची सूचना महसूल प्रशासनाने दिली आहे.
कालावल खाडीपात्रामध्ये होणाऱ्या अनधिकृत वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर मालवण महसूल विभाग व बंदर विभाग यांच्यामार्फत कालावल खाडीत संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये रेवंडी जेटी परिसर व त्या समोरील भागात अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याचे दिसून आले नाही. या पथकाला बंडा बेटानजीक वाळूने भरलेल्या तीन होड्या किनाऱ्यावर आढळून आल्या. या होड्यांमध्ये अनुक्रमे ६ ब्रास, २ ब्रास व ५ ब्रास एवढी वाळू होती तर शेरे जमिनीमध्ये ४ ब्रास वाळूचां साठा आढळून आला. ही वाळू व होड्या मालवण बंदर निरीक्षक यांनी तोंडवळी पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिल्या आहेत.
तसेच या पाहणी दरम्यान रेवंडी स्मशानभूमी येथे पाडलेल्या स्थितीत दगडी रॅम्प दिसून आले. गावकरवाडी येथे २ लोखंडी रॅम्प दिसून आले. तसेच वायंगणी सडयेवाडी येथे ४ दगडी रॅम्प व ४ लोखंडी रॅम्प, तेरई येथे ७ दगडी रॅम्प, भगवंतगड येथे ७ दगडी रॅम्प व ४ लोखंडी रॅम्प, तोंडवळी करंजेवाडी येथे ४ दगडी रॅम्प, तोंडवळी मधलीवाडी येथे एका ठिकाणी ७ तर दुसऱ्या ठिकाणी ८ दगडी रॅम्प दिसून आले. हे सर्व रॅम्प नष्ट करून टाकण्याच्या सूचना प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.