loader
Breaking News
Breaking News
Foto

सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांचा कार्यक्रम अचानक रद्द झाल्याने संगीत प्रेमी संतापले

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात प्रमोद महाजन मैदानावर सुप्रसिध्द गायक महेश काळे यांचा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची जोरदार जाहिरातबाजीही झाली. मात्र तिकीट काढून कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांचा मात्र रसभंग झाला. कार्यक्रम रद्द झाल्याचे त्यांना ठाऊकच नव्हते. नियोजित कार्यक्रमस्थळी मोठी वादावादी झाली. अखेर पोलिसांना बोलवावे लागले. रविवार दि. ५ एप्रिल रोजी हा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी गेले दोन आठवडे जाहीरातबाजीही सुरु होती. मात्र या कार्यक्रमाची तयारी सुरु नसल्याने कार्यक्रम होणार की नाही याबाबत अनेकांना शंका होती. काही लोकांनी ऑनलाईन तिकीटे काढली होती. बाहेरगावातून ते कार्यक्रम पाहण्यासाठी सायंकाळी प्रमोद महाजन क्रीडांगणावर दाखल झाले. मात्र कार्यक्रमाची तयारीच दिसत नव्हती. यामुळे लोकांनी फोनाफोनी सुरु केली. कुणीतरी आयोजकांशी संपर्क साधला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान रसभंग झाल्याने संगीतप्रेमींचा पारा चढलेला होता. वातावरण तापल्याने पोलिसांना बोलवावे लागले. अखेर या कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या दिव्येश बापट व गंधार जोग यांनी हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करावा लागल्याचे सांगितले. ऑन लाईन तिकीट बुकींग प्लॅटफॉर्मवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रेक्षकांना कार्यक्रम रद्द झाल्याची सूचना वेळेवर पोहोचली नाही. सर्व प्रेक्षकांना ऑफ लाईन तिकीटचा परतावा देण्यात आला आहे. ऑनलाईन बुकींग केलेल्या प्रेक्षकांचेही पैसे येत्या दोन ते तीन दिवसात परत करण्यात येतील अशी माहिती आयोजकांनी दिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg