खेड : भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त खेड शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर प्रभाग क्रमांक ६ मधील नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर यांच्या वॉर्डातील पदुमले वाडी येथील समाज मंदिरात उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये परिसरातील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत नेत्रतपासणी करून घेतली. गरजू रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत भाजपा खेडतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाला भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका सौ. स्वप्नाली राकेश चव्हाण, भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद (दादू) नांदगांवकर यांच्यासह माजी नगराध्यक्षा सौ. उर्मिला उदय पाटणे शेट्ये, प्रीती चिखले, राधेश्याम वर्मा, वैजेश सागवेकर, संदीप सासणे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार तसेच ओवैस चौगुले, अनिकेत पवार, केदार वणजू, विजय गुप्ता, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.