खेड - खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथे दि.३० मार्च २०२६ रोजी सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. सबा पालेकर व संस्था सेक्रेटरी डॉ.संजना पाष्टे यांच्या हस्ते विद्येची आराध्यदेवता सरस्वती देवीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी यु.के.जी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सिनियर केजीचे विद्यार्थी मायसा चौधरी, त्रिशा कोंडके, इस्माइल पालेकर यांनी शाळा व शिक्षक यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. हर्षदा कदम व जैनब कादरी यांनी पालक प्रतिनिधी म्हणून त्यांचे शाळेबद्दल व कार्यक्रमाबद्दल आपले अनुभव व्यक्त केले.
यावेळी संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, संस्था सेक्रेटरी डॉ.संजना पाष्टे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस.अली, पालक प्रतिनिधी स्वरदा जाधव, विभाग प्रमुख राधा चव्हाण, मीनाक्षी आंब्रे, जीवन वांद्रे, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अलफिया मेटकर यांनी केले.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.