loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत १२ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

​रत्नागिरी: 'जागतिक मेमन दिना'चे औचित्य साधून रत्नागिरीत एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 'रत्नागिरी मेमन जमात' आणि 'ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन (युवा विभाग), रत्नागिरी' यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत मेमन जमात हॉल, उद्यमनगर, रत्नागिरी येथे संपन्न होईल. "तुमच्या रक्ताचा एक थेंब कोणासाठी तरी आयुष्याचा महासागर ठरू शकतो," असा संदेश देत आयोजकांनी रत्नागिरीतील जास्तीत जास्त नागरिकांना या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमाला मेमन प्रीमियर लीग (MPL), ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनचा युवा विभाग, रत्नागिरी मेमन जमात महिला विभाग आणि ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन (AIMJF) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. शिबिराबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक रक्तदात्यांनी अशफाक (९५९५२२३२२३), आसिफ (९०२८११११५६) किंवा शाहीद (८०८७५२०००३) यांच्याशी संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg