loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयमध्ये सोनोग्राफी तज्ञ नसल्याने गैरसोय

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयकडे जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी यांचे लक्ष नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.गोवा राज्य शिवाय पर्याय नाही हे दररोज बघायला मिळते. दर गुरुवारी या ठिकाणी प्रसुतीसाठी सोनोग्राफी केली जाते, पण गुरूवारी सोनोग्राफी तंज्ञ उपस्थित न राहिल्याने अनेक महिला यांची गैरसोय झाली. ही माहिती समजताच ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी भेट देऊन डॉ. रेडकर समवेत चर्चा करून जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी यांना दूरध्वनी करून गैरसोय बाबत फैलावर घेतले सोनोग्राफी तंज्ञ यांची चौकशी करावी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी श्री.पाटील यांनी सदर सोनोग्राफी तज्ञास याबाबत संपर्क साधत तात्काळ दोडामार्ग रुग्णालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. बाबुराव धुरी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे रुग्णांची गैरसोय दुर होणार आहे. अशाप्रकारच्या चुका पुन्हा झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आवाज उठविला जाईल. रुग्णांना ञास होत असेल तर शिवसैनिक गप्प बसणार नाही असा इशारा धुरी यांनी दिला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg