अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलाशांची मालिका सुरूच आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. माहितीनुसार, खरातच्या गुन्हेगारीची मुळे आजची नसून तब्बल चार दशकांपूर्वीपासूनच त्याने हा काळा प्रवास सुरू केला होता. माहितीनुसार, 1980 साली, वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षीच खरातने एका नातेवाईक महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संबंधित महिला अपत्यप्राप्तीसाठी व्याकुळ असल्याचा फायदा घेत, खरातने तिला आपल्या भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होती.
या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना मिळताच संतापाची तीव्र लाट उसळली होती. संतप्त ग्रामस्थांनी खरातला बेदम मारहाण केल्याची माहितीही समोर येत आहे. या घटनेनंतर, पोलिसांच्या कारवाईची भीती आणि गावकऱ्यांचा रोष यामुळे खरातने एका रात्रीत गाव सोडून पलायन केल्याचे सांगितले जाते. यानंतर तब्बल 15 वर्षे खरात बेपत्ता होता. या काळात तो नेमका कुठे होता, कोणाच्या आश्रयाला होता आणि त्या दरम्यान त्याने आणखी कुठले गैरप्रकार केले का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, तपास यंत्रणांसमोर आता मोठे आव्हान उभे आहे. खरातच्या भूतकाळातील प्रत्येक धागा उलगडणे, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी करणे आणि या 15 वर्षांच्या काळात त्याने केलेल्या संभाव्य गुन्ह्यांचा शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा तथाकथित भोंदू बाबांच्या आड लपलेल्या गुन्हेगारीचा चेहरा समोर आला असून, अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.






























.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)

















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.