loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसे तळाशील वासियांच्या कायम सोबत राहणार - मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर

मालवण (प्रतिनिधी) - अनधिककृत वाळू उपशाविरोधात तळाशील ग्रामस्थांनी छेडलेल्या आंदोलनात मनसे पक्ष तळाशील ग्रामस्थांच्या सोबत असल्याची भूमिका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी स्पष्ट केली आहे. गेले काही महिने अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात तळाशील वासियांनी अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असा मनसेचा आरोप आहे. एवढ्या गंभीर स्वरूपाचे आंदोलन करून सुद्धा प्रशासन का डोळेझाक करतेय ? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. याला दुसरे तिसरे कारण नसून फक्त आणि फक्त हप्तेखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे हे होत आहे असा आरोप गणेश वाईरकर यांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व बाबींचा विचार करता लोकप्रतिनिधी नक्की कोणाला पाठीशी घालत आहेत ? हा सुद्धा मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही. या विषयी मनसेचे नेते संदीप दळवी यांच्या मार्फत मनसे अध्यक्ष यांच्याकडे हा विषय मांडणार असल्याचे गणेश वाईरकर यांनी सांगत मनसे कायम जनतेसोबत राहील, असे स्पष्ट केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg