loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर क्रेन पलटली

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे, घोडबंदर, भिवंडी, कल्याण, नाशिक आणि समृद्धी महामार्गाची हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते.कोपरी रेल्वे पूलावर बुधवारी दुपारी क्रेन पलटल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. मुंबई आणि ठाणे या दोन्ही दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, या संकटकाळात वाहतूक पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि नियोजन कौशल्य यामुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेमुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर रांगा लागल्या. आधीच संध्याकाळच्या गर्दीचा वेळ जवळ येत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी वेळीच परिस्थिती ओळखत तात्काळ निर्णय घेतला.मुंबईकडून ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याचे लक्षात घेऊन, ठाण्याहून मुंबईकडे जाणारी एक मार्गिका तात्पुरती बंद करण्यात आली आणि तीच मार्गिका मुंबईकडून ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली. या स्मार्ट निर्णयामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि वाहनचालकांना दिलासा मिळाला.

टाइम्स स्पेशल

घटनास्थळी वाहतूक पोलिसांची अक्षरशः धावपळ सुरू होती. उकाडा, धूर आणि वाहनांची गर्दी यामध्येही पोलिसांनी संयम राखत वाहतूक नियंत्रित केली. त्यांच्या या कार्यक्षमतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि काही वेळातच वाहतूक सुरळीत होताना दिसली. नवीन पुलाचे काम सुरू असताना घडलेल्या या घटनेतून वाहतूक व्यवस्थापनाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, वाहतूक पोलिसांच्या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg