loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड-जामसंडेत उबाठा युवा सेनेला खिंडार, उपजिल्हाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्ष प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) - देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शाल घालून पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे उपस्थितीत होते. जामसंडे-देवगड येथील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला असल्याने देवगड तालुक्यात उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवगड येथील उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद नितीन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शाखाप्रमुख, बूथप्रमुख अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. यामध्ये शाखाप्रमुख राजेंद्र शिरोडकर, बूथप्रमुख घननीळ कणेरकर, शाखाप्रमुख प्रदीप पडेलकर, बूथप्रमुख भालचंद्र पारकर, शाखाप्रमुख गणपत जाधव, बूथप्रमुख प्रवीण जाधव, शाखाप्रमुख ओंकार लाड, बूथप्रमुख गणपत लाड, बूथप्रमुख सुरज भिडे, शाखाप्रमुख दिनेश परब, बूथप्रमुख जनार्दन कोयंडे, तसेच बबन केवळ यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

टाईम्स स्पेशल

या प्रवेशामुळे देवगड तालुक्यात भाजपची ताकद अधिक मजबूत झाली असून उबाठा सेनेना मात्र आणखीनच दुबळी झाली आहे. यावेळी बोलताना निनाद नितीन देशपांडे म्हणाले आम्ही पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विकास आणि जनतेच्या प्रश्नाची जाण असलेले नेतृत्व पालकमंत्री नितेश राणे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेसाठी सक्रिय काम करू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg