रत्नागिरी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील तरवळ मायंगडेवाडी येथे दोन घरामध्ये चोरी झाली. या दोन घरातील चोरट्याने ३८ हजाराची रोख रक्कम पळविली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. आदित्य देवचंद्र कांबळे (वय २६, रा. बालाजी अपार्टमेंट कारवांचीवाडी फाटा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली.
रविवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास तरवळ मायंगडेवाडी येथे या चोर्या झाल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विरेश प्रकाश मायंगडे (वय २९) व प्रज्योत रविंद्र मायंगडे (वय २३, दोघेही रा. तरवळ मायंगडेवाडी, रत्नागिरी) यांच्या घरामध्ये चोरी झाली. रविवारी दुपारी चोरट्याने या दोन्ही घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा धारदार हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. घरातील लोखडी कपाटाचे ड्रॉव्हरमधील ३३ हजार रोख रक्कम काढून पळून जात असताना फिर्यादी यांनी सर्वेश संदेश मायंगडे यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की करुन पलायन केले. तर फिर्यादी प्रज्योत मायंगडे यांच्या घरातून मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश करुन घरातील उघड्या कपाटात छोट्या पाकिटात ठेवलेले ५ हजार रुपये पळविले. असा ३८ हजाराच्या रोख रक्कमेवर चोरट्याने डल्ला मारला. या प्रकरणी फिर्यादी विरेश मायंगडे व प्रज्योत मायंगडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.











































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.