ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यात पुर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबई, नवी मुंबई तसेच घोडबंदर, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. या महामार्गालगत लुईस वाडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभदिप निवासस्थान आहे. त्यांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कालिका मंदिराजवळील महामार्गावर मंगळवारी सकाळी एका माथेफेरूने भर रस्त्यावर धिंगाणा घातला. तो हातात मोठी काठी घेऊन तो रस्त्यावर धावत होता आणि येणाऱ्या वाहनांच्या दिशेने काठी फिरवत होता. त्याने बिनधास्तपणे तीन वाहनांच्या काचा फुटून त्यांचे नुकसान झाले. याप्रकरणी घटनास्थळी नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी मंगळवारी सकाळी १० वाजता एक व्यक्ती राजरोसपणे हातात मोठी काठी घेऊन आला आणि रस्त्यावर सैरावैरा धावू लागला. हा प्रकार पाहून नागरिक त्याला पाहून सैरवैर झाले. काहींनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने वाहनांच्या दिशेने काठी फिरविण्यास सुरूवात केली. यात दोन कार आणि एक रिक्षाचा समावेश आहे. हातात काठी असल्याने त्याला पकडणेही शक्य होत नव्हते.वाहनचालक नफिज कामृद्दीन शेख यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुनील राजदर वानखेडे असे संशयित आरोपीचे नाव असून तो मुळचा जळगाव जिल्ह्यातील मुडी गावचा रहिवाशी आहे. त्याने चार चाकी गाडीवर लाकडी काठी मारून गाडीची पुढील आणि मागील काच फोडली तसेच त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या रिक्षा आणि एका कारची पुढील काच फोडलेली आहे.
त्याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२४ (४) प्रमाणे तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. तक्रारदारासह इतर वाहनचालकांनी सुनील राजधर वानखेडे याला मारहाण केल्याने त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार करून नंतर पोलीस ठाण्यात आणले होते. चौकशीत त्याला मानसिक आणि आकडीचा त्रास असून त्याच्यावर उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. आरोपी सुनील याच्येविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुण दाखल करण्यात आला असून तो इथे कशासाठी आला होता. याचा पोलिस तपास सुरू आहे.











































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.