loader
Breaking News
Breaking News
Foto

अशोक खरातची महिलांना जाळ्यात ओढण्याची ट्रिक समोर; मोठी कबुली

नाशिक: भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणार्‍या अशोक खरात प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अनेक दिवस मौन बाळगलेल्या खरातने अखेर पोलिसांसमोर कबुली दिली असून, त्याच्या या कबुलीमुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. विशेष म्हणजे, आपल्या कृत्याचं समर्थन करताना त्याने या सगळ्या प्रकाराला ‘विज्ञान’ आणि ‘टॅलेंट’चं लेबल लावण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या नावाखाली उघड झालेल्या अशोक खरात प्रकरणाने राज्याला हादरवून सोडलं आहे. अनेक महिलांवर अत्याचार केल्याची कबुली देताना त्याने ‘विज्ञान’ आणि हातचलाखीचा आधार घेतल्याचं सांगितलं. मात्र, पश्चातापाचा लवलेश नसताना त्याचा माज कायम असल्याचं उघड झालं आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि फसवणुकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, कोठडीत असताना खरातने अनेक गंभीर खुलासे केले. महिलांना धमकावून, मानसिक दबाव निर्माण करून आणि हातचलाखीच्या माध्यमातून त्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याची कबुली त्याने दिली आहे. लोक ज्याला चमत्कार किंवा वशीकरण समजतात, त्या गोष्टी प्रत्यक्षात हातचलाखी आणि मानसशास्त्राचा वापर करून केल्या जात असल्याचं त्याने मान्य केलं आहे. खरातने पीडित महिलांवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. त्यानंतर ’दैवी शक्ती’ असल्याचा आभास निर्माण करून त्यांना फसवलं. या प्रक्रियेत त्याने काही तथाकथित ’वैज्ञानिक ट्रिक्स’ वापरल्याचा दावा केला. मात्र, या सर्व गोष्टींमागे कोणतीही दैवी शक्ती नसून, केवळ फसवणूक आणि मनोवैज्ञानिक खेळ असल्याचं त्याच्या कबुलीतून स्पष्ट झालं आहे.

टाईम्स स्पेशल

धक्कादायक बाब म्हणजे, एवढ्या गंभीर गुन्ह्यांची कबुली देऊनही खरातला आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचं समोर आलं आहे. उलट, दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए असं वक्तव्य करत त्याने आपला माज अजूनही कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. महिलांना कसं भुलवलं, त्यासाठी कोणत्या युक्त्या वापरल्या, याबाबतही त्याने सविस्तर माहिती दिली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, खरातला कोणाची मदत मिळत होती का, याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिक सखोल करण्यासाठी विशेष तपास पथक (डखढ) काम करत असून, लवकरच पत्रकार परिषदेत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कबुलीमुळे समाजात खळबळ उडाली असून, भोंदूगिरीच्या आडून सुरू असलेल्या अशा प्रकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. लोकांनी अशा फसव्या दाव्यांपासून सावध राहण्याची गरज असल्याचंही यानिमित्ताने अधोरेखित झालं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg