loader
Breaking News
Breaking News
Foto

रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु न केल्यास मणेरी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

दोडामार्ग (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री ग्रामसडक मधून मंजूर झालेल्या मणेरी तळेवाडी, धनगरवाडी ते आंबेली रस्ता दुरुस्ती काम संबंधित अधिकारी ठेकेदार यांनी न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी संबंधित रस्ता निर्माण संस्था कुडाळ यांच्या कार्यालय ठिकाणी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. मणेरी ग्रामस्थ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मणेरी तळेवाडी धनगरवाडी आंबेली हा रस्ता सन २०१७ मध्ये आपल्या कार्यालयाकडून करण्यात करण्यात आलेला असून सदर रस्ता देखभाल दुरुस्ती अंतर्गत मंजूर असून सदर रस्त्याची निविदा प्रक्रियाही झालेली आहे. तरी सदर काम मक्तेदार यांनी सुरु केलेले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर काम दिनांक-०७/०४/२०२६ पर्यंत चालू न केल्यास आम्ही ग्रामपंचायत कार्यकारणी सह मणेरी ग्रामस्थ दिनांक-०८/०४/२०२६ रोजी पासून आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार, असा इशारा दिला आहे. यावेळी यावेळी मणेरी सरपंच सिध्दी गणपत कांबळे, उपसरपंच विशाल मोहन परब, माजी सरपंच विशांत तळवडेकर, श्यामल भुजबळ, रामा काळे, शिवराम मोरजकर व इतर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg