loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणे परिसरात भरदिवसा घरफोडी; मोबाईलसह रोख रकमेवर चोरट्याचा डल्ला

खेड - तालुक्यातील भरणे परिसरातील श्रीराम समर्थ कॉम्प्लेक्समध्ये भरदिवसा चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने घरात घुसून मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी उदय परशुराम घाग हे भरणे येथील श्रीराम समर्थ कॉम्प्लेक्सच्या 'ए' विंगमधील रूम नंबर ३०१ मध्ये राहतात. ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. चोरट्याने हॉलमध्ये ठेवलेला २१ हजार ५९९ रुपये किमतीचा विवो कंपनीचा राखाडी रंगाचा अँड्रॉइड मोबाईल आणि पर्समध्ये ठेवलेली ५ हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण २६ हजार ५९९ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेला.

टाईम्स स्पेशल

याप्रकरणी उदय घाग यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ९१/२०२६ अन्वये नोंद केला आहे. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg