loader
Breaking News
Breaking News
Foto

'खेडमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी करावी' निवेदन सादर

खेडः अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायद्याची प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या येथील शाखेने पोलीस व तहसील प्रशासनास निवेदनाद्वारे केली आहे. शहरासह ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने जादूटोणा, अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, शोषणकारी बुवाबाजीसारखे प्रकार सुरू आहेत. काही घटकांकडून नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शोषण केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे प्रशासनाने अस्तित्वातील कायद्याची अंमलबजावणी करावी, भरारी पथकांमार्फत देखरेख ठेवावी, दोषींवर कारवाई करावी, जागरूकतेसाठी शाळा, महाविद्यालये, न.प. व ग्रामपंचायत स्तरावर वैज्ञानिक दृष्टीकोनसारखे उपक्रम राबवावेत अशी मागणी केली आहे. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, तहसीलदार सुधीर सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी समितीचे मोहन चव्हाण, प्रशांत पावसकर, संजय काशिद, नेत्रदीप तांबे, अक्षय तांबे, सचिन बेर्डे आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg