loader
Breaking News
Breaking News
Foto

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार नारायणराव राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात भव्य 'मोफत आरोग्य तपासणी शिबीर' आणि 'मोफत आभा कार्ड व वयवंदना नोंदणी शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. या विशेष शिबिराचे उद्घाटन रत्नागिरीचे जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. जगताप यांच्या हस्ते फीत कापून उत्साहात करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे उपस्थित होते. तर भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, भक्ती दळी महिला शहराध्यक्ष, निलेश आखाडे, प्रज्ञा टाकळे, मुक्ता बाष्टे, प्रसाद बाष्टे, शर्मिली सावंत, अनघा आकेरकर, मनाली राणे, राजश्री मोरे, सायली बेर्डे, शैलेश बेर्डे, सोनाली केसरकर, अनुष्का शेलार यांनीही शिबिराला भेट दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तर उद्घाटन प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाडेकर, भाजपा अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्ष शोएब खान, खा. नारायण राणे यांचे स्वीय सहाय्यक योगेश मगदूम, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल देसाई, कृष्णा पाटील, शिवाजी कारेकर, राहुल भाटकर, भाजपा शहर उपाध्यक्ष शैलेन्द्र बेर्डे, नित्यानंद दळवी, सोमनाथ पिलणकर , नरेश बनसोडे, अभि कारेकर, विशाल कांबळे, निखिल शेट्ये, दुर्गेश पिलणकर, पवन श्रीनाथ, सूचित वारेकर, शुभम जोशी, पांडुरंग पावसकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​आरोग्य मंदिर येथील संपर्क कार्यालयात ६ ते ८ एप्रिल दरम्यान हे शिबिर सुरू राहणार असून, पहिल्या दिवशी शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात विविध आरोग्य चाचण्यांसह शासकीय योजनांची नोंदणीही केली जात आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे शिबीर ८ एप्रिल २०२६ पर्यंत असून सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत आहे. या शिबिरात प्रामुख्याने रक्त चाचण्या: शुगर (Sugar), बीपी (BP), एचबी (HB), सीबीसी (CBC), महिलांसाठी कॅन्सर तपासणी आणि मुख (तोंड) कॅन्सर तपासणी या विशेष तपासणी तसेच डोळे तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असल्यास ईसीजी (ECG) सुविधा देखील उपलब्ध असेल. तसेच ८ एप्रिल रोजी नंदादीप नेत्रालयाच्या वतीने मोफत डोळे तपासणी होणार आहे. तर रामनाथ हॉस्पिटल तर्फे ७ एप्रिलला आरोग्य तपासणी होणार आहे.

टाईम्स स्पेशल

आरोग्य तपासणीसोबतच, शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी 'आभा कार्ड' (ABHA Card) आणि 'वयवंदना' योजनेची मोफत नोंदणी केली जाणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी येताना खालील कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. त्यामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा समावेश आहे. रत्नागिरी आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. खासदार नारायणराव राणे साहेब जनसंपर्क कार्यालय, आरोग्य मंदिर, रत्नागिरी येथे हे शिबिर होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: अमोल देसाई - +91 89992 51217 आणि अभिलाष कारेकर - +91 70575 76474 यांच्याशी संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg