loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्गात एनजीओ समन्वयासाठी पुढाकार; ८ दिवसांत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन

बांदा (प्रतिनिधी) - जिल्ह्यात कार्यरत सामाजिक संस्थांचा शासनाच्या विविध योजनांमध्ये अधिक प्रभावी सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या दालनात पार पडली. कोकण एनजीओ असोसिएशनच्या वतीने आयोजित या बैठकीत जिल्ह्यातील तब्बल २६ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. ही बैठक दयानंद कुबल यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, महिला व बालविकास, पर्यावरण तसेच ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाली. अनेक योजनांमध्ये सामाजिक संस्थांचा मर्यादित सहभाग असल्याने योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याचे प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हास्तरावर सर्व संस्थांची अधिकृत नोंदणी व डेटाबेस तयार करणे, विविध योजनांमध्ये एनजीओना अंमलबजावणी भागीदार म्हणून संधी देणे, नियमित प्रशिक्षण व मार्गदर्शन, “एनजीओ समन्वय समिती” स्थापन करणे, तसेच जनजागृती व सर्वेक्षणासाठी संस्थांना अधिकृत मान्यता देणे अशा महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी या सर्व मागण्यांची दखल घेत येत्या आठ दिवसांत संबंधित अधिकारी व सामाजिक संस्थांची संयुक्त बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील विकास प्रक्रियेत सामाजिक संस्थांचा सहभाग अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg