loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय हिंदी मानक परीक्षेत वेदिका तेंडुलकर जिल्ह्यात द्वितीय

मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय 'स्व. विजयकुमार माळगावकर स्मृती मानकवर्तनी परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वेदिका प्रमोद तेंडुलकर हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून देदीप्यमान यश संपादन केले आहे. ओरोस येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढीच्या सभागृहात संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय हिंदी शिक्षक संमेलनात तिला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यातून सुमारे १५०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत वेदिकाने दुसऱ्या क्रमांकावर मोहोर उमटवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष प्रमोद कामत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अमोल पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक सन्मान समितीच्या मुख्य समन्वयक आश्लेषा पारकर होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर, हिंदी कला अकादमीचे अध्यक्ष कैलास जाधव, पतपेढीचे अध्यक्ष समीर परब, आणि जिल्हा हिंदी मंडळाचे अध्यक्ष सुमंत दळवी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

शतक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या वराडकर हायस्कूलच्या शिरपेचात वेदिकाच्या या यशामुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त कर्नल शिवानंद शरद वराडकर, ॲड. सोनू शंकर पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई यांसह सर्व संचालक मंडळाने तिचे कौतुक केले आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट आणि हिंदी विभाग प्रमुख बी. एम. वाजंत्री, एस. एस. चांदरकर, भूषण गावडे व जांभवडेकर यांनी वेदिकाला मार्गदर्शन केले. वेदिकाच्या या यशामुळे तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg