loader
Breaking News
Breaking News
Foto

खराब रस्त्याची यादी करा, जि.प. उपअभियंता यांना सूचना

रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून, सुमारे साडेसहा हजार किलोमीटर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वेगळे पॅकेज शासनाकडून मिळावे यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जि.प. उपाध्यक्ष आणि बांधकाम सभापती विलास चाळके यांनी घेतल्याचे सांगितले. पावसाळ्यात काही रस्त्यांची दुरावस्था होऊन एसटी बसेस बंद होतात, या सेवा बंद होऊ नये यासाठी एसटी महामंडळ आणि जि.प. उपअभियंता यांनी अशा खराब रस्त्याची यादी करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जि.प. उपाध्यक्ष व बांधकाम समितीचे सभापती विलास चाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बांधकाम समितीची बैठक उपाध्यक्षांच्या दालनात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात साडेसहा हजार किमीचे रस्त्याचे जाळे आहे. त्यात एक हजार किमीचे इतर जिल्हामार्गांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरावस्था झाली आहे. पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांची डागडूजी करणे आवश्यक आहे. गेल्या दोन-चार वर्षात पावसाळ्यात रस्त्यांमुळे एसटीच्या काही फेऱ्या ग्रामीण भागात बंद केल्या जातात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे प्रामुख्याने हाल होतात, या विषयावरही बैठकीत चर्चा झाली.

टाइम्स स्पेशल

जिल्ह्यातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेणार असल्याचे बांधकाम सभापती विलास चाळके यांनी सांगितले. रस्त्यांसाठी शासनाकडून जिल्ह्याला विशेष पॅकेज मिळावे अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली जाणार आहे. यामध्ये काही प्रमुख जिल्हा मार्गांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यात अनेकदा खराब रस्त्यांमुळे एसटी बंद होते. या सेवा सुरळीत रहाव्यात यासाठी अशा खराब झालेल्या रस्त्यांची पहिल्या टप्प्यात दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाचे अधिकारी आणि जि.प. बांधकामच्या उपअभियंत्यांनी दुरावस्था झालेल्या रस्त्यांची यादी तयार करुन पुढील दोन-चार दिवसात समितीसमोर ठेवावी अशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जि.प. बांधकाम समिती गठीत झाल्यानंतर गुरुवारी पहिलीच सभा उत्साहात पार पडल्याचे सभापती चाळके यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg