दापोली (प्रतिनिधी) - गिम्हवणे ग्रामदेवता श्री देव भैरी देवस्थान मंदिराच्या भव्य प्रांगणात श्री देव भैरी भानेश्वर यात्रौत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जालगाव आणि गव्हे येथील ग्रामदेवता श्री भैरी देवतांच्या मानाच्या काठ्या गिम्हवणे ग्रामदेवता मंदिरासमोर वाजत गाजत आणून मोठ्या भक्तिभावाने उभ्या करण्यात आल्या होत्या. दापोली तालुक्यातील गिम्हवणे, जालगाव आणि गव्हे येथील ग्रामदेवता श्री भैरी देवस्थानच्या काठयांची जत्रा ही एक प्राचीन परंपरा असून अगदी रंगीबेरंगी कापडाने सजविलेल्या मानाच्या काठ्या (काठी) वाजत-गाजत ज्या ठिकाणी जत्रा असेल तेथील स्थानिक देवाच्या जत्रेत मोठ्या उत्साहात भावक्तीभावाने आणल्या जातात. काठयांच्या जत्रोत्सवाची ही परंपरा गिम्हवणे जालगाव आणि गव्हे येथील भक्ती आणि संस्कृतीचे दर्शन घडवते. अशा या काठ्यांचा जत्रोत्सव साजरा करण्याच्या भावभक्तीची परंपरा आणि सांस्कृतीक वारसा जतन करण्याचे महत्त्वाचे कार्य हे तिन्ही गाव आजही त्याच भावनेने आणि उत्साहाने करत आहेत. असा हा काठ्यांचा जत्रोत्सव बुधवारी गिम्हवणे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बुधवारी गिम्हवणे श्री देव भैरी मंदिरासमोरील भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात काठ्यांची जत्रा साजरी करण्यात आली. यावेळी गिम्हवणे, जालगाव आणि गव्हे या तीन गावांतील भैरी देवस्थानच्या काठ्या (निशाण) मानाने एकत्र उभे करण्यात आले होते. ज्याला 'देवाची भेट' मानले जाते. गावकऱ्यांमधील प्रेमभावना आणि अखंडता दर्शवणा-या अशा या जत्रोत्सवात गिम्हवणे येथील स्थानिक रहिवासी ग्रामस्थ बंधुभगिनींसह लहान थोर अबालवृद्ध मोठ्या संख्येने या जत्रोत्सवात सहभागी झाले होतेच शिवाय जालगाव आणि गव्हे येथील गावांसह गिम्हवणे वणंद परिसरातील गावांमधील भक्तगण भाविक त्याचप्रमाणे दापोली शहरातील लोक देखील मोठ्या उत्साहाने या जत्रोत्सवात सहभागी झाले होते. दापोली तालुक्यातील गिम्हवणे, गिम्हवणे आणि गव्हे या तिन्ही गावांतील ग्रामदैवत श्री भैरी देवस्थान असून काठी हे या देवाचे प्रतीक मानले जाते. अशा या देवस्थानच्या काठ्यांची भेट जत्रोत्सवाच्या दिवशी प्रत्येक गावाच्या ग्रामदैवतेच्या मंदिरासमोर घडवून आणली जाते. ढोल-ताशांच्या गजरात तीनही गावांतील काठ्या निघतात आणि त्यांची भेट होते. तशी आज बुधवारी गिम्हवणे येथील श्री देव भैरी मंदिरासमोरील भव्य प्रांगणात काठयांच्या जत्रोत्सवानिमित्त भेट घडवण्यात आली.
जत्रेच्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. येथे मिठाई आणि खेळण्यांच्या दुकानांसह विविध प्रकारची दुकाने दुकानदारांनी थाटली होती. तेथे खरेदीसाठीही मोठीच झुंबड उडाली होती. अशा या गिम्हवणे येथील जत्रोत्सवासाठी जालगाव आणि गव्हे येथील ग्रामदैवतेंच्या मानक-यांनी खांद्यावर मानाच्या आणलेल्या काठ्या मंदिरासमोर उभ्या करण्यात आल्या. त्याचबरोबर काठयांसोबत आलेले ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने जत्रोत्सवात सहभागी झाले. असा हा जत्रोत्सव दापोलीच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा आणि भक्तीभाव मना मनात दृढ करणारा व गावागावांतील नातेसंबंध अधिक घट्ट करणारा असा हा जत्रोत्सव आहे. जालगाव येथे शुक्रवारी ३ एप्रिलला झाला. तर आज बुधवारी गिम्हवणे येथील जत्रोत्सव पार पडले. त्यानंतर आता गव्हे येथील जत्रोत्सव शुक्रवारी १० एप्रिलला होणार आहे.





.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)













































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.