loader
Breaking News
Breaking News
Foto

एमपीएससी राज्यसेवेचा अंतिम निकाल जाहीर; सोलापूरचा विजय लामकाने राज्यात पहिला

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा अयोगातर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2024 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. एमपीएससीकडून 27 ते 29 मे, 2025 या कालावधीत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2024 घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा अंतिम निकाल आज 8 एप्रिल रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. या निकालामध्ये विविध 20 संवर्गातील एकूण 461 पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने हे सर्वसाधारण तथा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील आरती जाधव या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वैद्यकीय तपासणीस अनुपस्थित असलेले वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा अंतिम निकालात समावेश करण्यात आलेला नाही. प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या व अन्य मुद्यांसंदर्भात विविध न्यायालयात / न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेकरिता मा. उच्च न्यायलय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र.1746/2026 प्रकरणी दिनांक 18 फेब्रुवारी, 2026 रोजी झालेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांचा निकालात समावेश करण्यात आला आहे. तथापि, प्रशासकीय कारणास्तव सदर उमेदवाराची शिफारस राखून ठेवण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg