loader
Breaking News
Breaking News
Foto

लाटवण पिंपळगाव येथील पूल होण्याआधीच कोसळला

खेड - मंडणगड तालुक्यातील लाटवण पिंपळगाव (रामवाडी) येथील नदीवर बांधण्यात येत असलेला नवीन पूल पूर्ण होण्याआधीच कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर आणि एकूणच विकासकामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाचे बांधकाम काही दिवसांपासून सुरू होते. मात्र, सुरुवातीपासूनच कामाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, बांधकामातील तांत्रिक त्रुटी आणि देखरेखीचा अभाव याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. तरीदेखील संबंधित यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप नागरिक करत आहेत. ४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास अचानक पुलाचा एक मोठा भाग कोसळला. सुदैवाने, त्या वेळी कामगार किंवा नागरिक त्या ठिकाणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हा पूल पूर्ण झाल्यानंतर वापरात असताना कोसळला असता, मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून जनतेच्या कराच्या पैशातून उभारण्यात येणार्‍या कामांचा दर्जा इतका खालावला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही अशा प्रकारे पूल कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे मत आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, या प्रकरणात संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि देखरेख करणार्‍या अधिकार्‍यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे. कामाच्या गुणवत्तेची तपासणी न करता बिलांचे भुगतान करण्यात आले का, याचाही तपास व्हावा, अशी मागणी होत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बांधकाम प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्ता नियंत्रण यावर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान पुलाच्या कोसळण्याची चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे. निकृष्ट काम करणार्‍यांना काळ्या यादीत टाकावे पुन्हा दर्जेदार व सुरक्षित पूल उभारावा अशी मागणी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg