loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ; नगरपरिषद कॉम्प्लेक्समधील ६ दुकाने फोडली

सावंतवाडी (प्रतिनिधी) - कणकवली येथील चोरीच्या घटनेनंतर आता चोरट्यांनी आपला मोर्चा सावंतवाडी शहराकडे वळवला आहे. आज पहाटेच्या सुमारास सावंतवाडी नगरपरिषद कॉम्प्लेक्समधील दुकानांवर चोरट्यांनी डल्ला मारला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी नगरपरिषद कॉम्प्लेक्समधील एकूण ६ दुकानांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये ४ दुकानांची कुलपे तोडून आत शिरण्याचा प्रयत्न झाला, तर दोन दुकानांतून रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. एका दुकानातील ५ हजार रुपये आणि एका बेकरीतील २ हजार रुपये असे एकूण ७,००० रुपये चोरट्यांनी पळवले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक सरदार पाटील, हवालदार शिंगाडे, शिंदे आणि धोत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेतले असून त्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे.

टाईम्स स्पेशल

श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेनंतर रीतसर पंचनामा केला जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील हे करत आहेत. लागोपाठ होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg