संगमेश्वर (प्रतिनिधी) : देवरूख आणि परिसरातील नागरिकांना HP Gas सिलेंडर वेळेवर न मिळाल्याबाबत वाढती नाराजी लक्षात घेऊन संगमेश्वर दक्षिण भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगराध्यक्षा तसेच महायुतीचे नगरसेवक यांनी आज संबंधित गॅस एजन्सीकडे थेट जाब विचारला. गॅस वितरणात होणारा अनावश्यक विलंब, नागरिकांना दिले जाणारे उडवाउडवीचे उत्तरे आणि वितरण यंत्रणेतील गैरकारभार याबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तत्पश्चात तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती देत तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
गॅस ग्राहकांनी सिलिंडर बुक करून १५-२० दिवस होऊन पण एजन्सी सिलिंडर घरपोच करत नाहीत व कार्यालयात २ दिवस उन्हात कूपन देऊन रांग लाऊन पण सिलेंडर मिळत नसल्याची नागरिकांनी तक्रारी केल्या. संगमेश्वर दक्षिण भाजपा पदाधिकाऱ्यांनी गॅस एजन्सीधारकाला स्पष्ट सांगितले की, जनतेला मूलभूत सुविधा वेळेवर मिळणे ही एजन्सी ची जबाबदारी असून गॅससारख्या अत्यावश्यक सेवेत कोणत्याही प्रकारची ढिलाई सहन केली जाणार नाही. तहसीलदार तसेच पुरवठा विभागाने सुद्धा तातडीने चौकशी करून गॅस वितरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच नागरिकांना नियमित आणि वेळेवर गॅस पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली.
स्थानिक नागरिकांनीही भाजपा पदाधिकाऱ्यांचे वेळेवर हस्तक्षेपाबद्दल कौतुक केले असून, समस्येवर त्वरित तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी भाजप संगमेश्वर तालुका अध्यक्ष रुपेश कदम, शहर अध्यक्ष सुशांत मुळ्ये, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष अभिजित शेट्ये, नगराध्यक्ष मृणाल ताई शेट्ये, माजी उपनगराध्य वैभव कदम, नगरसेविका स्वाती राजवाडे, कविता नार्वेकर, श्रद्धा इंदुलकर, प्राची भुवड, नेहा आंबेकर, रुपेश भागवत, प्रफुल्ल भुवड, आनंद सारदळ इत्यादी उपस्थित होते.











































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.