रत्नागिरी : जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मिऱ्या- पंधरामाड पांढरा समुद्र परिसरात अनधिकृत वाळू उपशाने सीमा ओलांडली आहे. आतापर्यंत छुप्या मार्गाने आणि रात्रीच्या अंधारात चालणारा हा काळा व्यवसाय आता चक्क दिवसाढवळ्या सुरू आहे. खनिकर्म विभागाच्या नाकावर टिच्चून निसर्गाची लूट सुरू आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक प्रचंड संतापले असून, प्रशासनाचे अधिकाऱ्यांना हे दिसते की नाही? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मिऱ्या परिसरात अनधिकृत वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सुरुवातीला हा उपसा केवळ रात्री आणि पहाटेच्या वेळी केला जात होता. मध्यरात्री वाळू भरून येणाऱ्या अवजड गाड्यांच्या आवाजामुळे स्थानिकांची झोप उडाली होती. मात्र, आता वाळू माफियांना कोणाचाही धाक उरलेला नसल्याचे चित्र आहे. पंधरा माड परिसरात समुद्राच्या पात्रातून आणि खाडी परिसरातून थेट बेकायदेशीर वाळू उपसा करून ती गाड्यांमध्ये भरली जात आहे. विशेष म्हणजे, हे सर्व जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ घडत आहे. वाळू उपशामुळे केवळ पर्यावरणाचे नुकसान होत नसून, स्थानिक पायाभूत सुविधांनाही मोठा फटका बसला आहे.
वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड गाड्यांमुळे मिऱ्या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि ओल्या वाळूतून सांडणाऱ्या पाण्यामुळे रस्ते खराब होत आहेत. वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अवैध वाहतुकीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रत्नागिरी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून येथे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि खनिकर्म विभागाची मुख्य कार्यालये आहेत. असे असूनही काही अंतरावर सुरू असलेला हा प्रकार खनिकर्म विभागाला दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. "महसूल आणि खनिकर्म विभागाचे कर्मचारी केवळ केबिनमध्ये बसून काम करणार आहेत का, अशी चर्चा आता रंगली आहे.























































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.