loader
Breaking News
Breaking News
Foto

पुनर्वसन न करता कालव्याची घाई; पोयनार धरणावर प्रश्नचिन्ह

रत्नागिरी - खेड तालुकामधील पोयनार धरण प्रकल्पावर पुन्हा वाद निर्माण झाला आहे. या धरणासाठी एकूण 265 कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्यानंतर नव्याने 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यात धरण कामासाठी 10 कोटी, सांडवा बांधकामासाठी 5 कोटी, पुनर्वसनासाठी निधी आणि कालवा कामासाठी तब्बल 95 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र धरणात अद्याप पाणीच नसताना कालव्याच्या कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय स्थानिकांमध्ये संतापाचा विषय ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुनर्वसनाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नसताना कालवा कामाला गती देण्यामागे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे. पुनर्वसनासाठी सुरुवातीला 300 गुंठे जमिनीचा दर निश्चित करण्यात आला होता; मात्र नव्या दरानुसार सुधारणा का करण्यात आली नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. धामणी आणि सीमावाडी या भागांमध्येच काही प्रमाणात पुनर्वसन झाले असून इतर गावांतील प्रकल्पग्रस्त अद्याप प्रतीक्षेत आहेत.

टाइम्स स्पेशल

शासनाच्या धोरणानुसार "आधी पुनर्वसन, मग धरण" हा नियम असताना येथे त्याचे पालन होत नसल्याची टीका होत आहे. भूखंडांचे वाटपही निकषांनुसार झाले नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पुनर्वसन पूर्ण न करताच कामाला गती देणे म्हणजे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय असल्याची भावना तीव्र होत आहे. प्रशासनाने तातडीने स्पष्ट भूमिका घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा, अन्यथा या प्रकल्पाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg