रत्नागिरी: समुद्राची अथांग गाज आणि रात्रीचा काळोख भेदत अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. ३ एप्रिलच्या रात्री मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान केलेल्या एका धाडसी मोहिमेत, मिऱ्या-काळबादेवी समुद्रकिनाऱ्यापासून साधारण १०.८३ सागरी मैल अंतरावर एल.ई.डी. (LED) दिव्यांच्या साहाय्याने मासेमारी करण्याच्या तयारीत असलेली 'भराडी प्रसन्न' ही नौका पथकाने रंगेहात पकडली. ४ एप्रिल रोजी पहाटे २.१७ मिनिटांच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे बेकायदा मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. जयगडच्या परवाना व अंमलबजावणी अधिकारी स्मितल कांबळे या आपल्या पथकासह नियमित सागरी गस्तीवर होत्या.
गस्त घालत असताना त्यांना मिऱ्या-काळबादेवी समोरच्या जलधि क्षेत्रात (१७°०३'८३४" उत्तर अक्षांश आणि ७३°०४'१३२" पूर्व रेखांश) संशयास्पद हालचाली दिसून आल्या. अधिक तपासणी केली असता, कैलास उल्हास कुबल (रा. राजवाडी, भगवती बंदर) यांच्या मालकीची 'भराडी प्रसन्न' (नोंदणी क्रमांक IND-MH-04-MM-3723) ही नौका तेथे नांगरून उभी असल्याचे आढळले. या नौकेवर तांडेलसह ५ खलाशी होते आणि समुद्रात प्रकाशझोत टाकून माशांना आकर्षित करण्यासाठी एल.ई.डी. दिवे तसेच जनरेटर सज्ज ठेवण्यात आला होता. नियमानुसार अशा प्रकारे कृत्रिम प्रकाशाचा वापर करून मासेमारी करणे पर्यावरणासाठी घातक असल्याने आणि त्यावर कायद्याने बंदी असल्याने, पथकाने तत्काळ नौकेसह सर्व साहित्य जप्त केले. जप्त केलेली नौका, जनरेटर आणि एल.ई.डी. दिवे पुढील कार्यवाहीपर्यंत मिरकरवाडा बंदरात कडक पहाऱ्यात ठेवण्यात आले आहेत.
या मोहिमेत अंमलबजावणी अधिकारी स्मितल कांबळे यांना सुरक्षा रक्षक सुजन पोवार, तसेच सागरी सुरक्षा रक्षक अमोल पिलणकर, अनिकेत पवार आणि भूषण करमरकर यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रकरणाचे सविस्तर प्रतिवेदन सादर झाल्यानंतर, महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) अध्यादेश २०२१ नुसार रत्नागिरीच्या सहाय्यक आयुक्त तथा अभिनिर्णय अधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. दोषींवर या कायद्यांतर्गत अत्यंत कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत विभागाने दिले आहेत. समुद्रातील जैवविविधता टिकवण्यासाठी अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र केल्या जातील, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.