loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी शहराचा वीज पुरवठा सोमवारी राहणार खंडित; देखभाल-दुरुस्तीसाठी महावितरणचा पुढाकार

​सावंतवाडी : सावंतवाडी शहराला वीज पुरवठा करणाऱ्या ११ केव्ही उच्चदाब वाहिनीच्या तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण शहराचा वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे. ​महावितरणने दिलेल्या पत्रकानुसार, पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी आणि वाहिनीच्या सक्षमीकरणासाठी ही दुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या भागातील काम पूर्ण होईल, त्या भागाचा वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने तातडीने सुरू करण्यात येईल. मात्र, नागरिकांनी कामाचे स्वरूप लक्षात घेऊन सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज पुरवठा बंद राहील याची नोंद घ्यावी.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमवारी दिवसभर वीज नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे पाणी भरणे, मोबाईल/लॅपटॉप चार्जिंग किंवा विजेवर चालणारी अन्य घरगुती व व्यावसायिक अत्यावश्यक कामे नागरिकांनी रविवारी पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन महावितरण सावंतवाडी उपविभागामार्फत करण्यात आले आहे. ​या देखभाल दुरुस्तीच्या कामात नागरिकांनी महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg