खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या बालवाटिका विभागात सिनियर के. जी. च्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना वृक्षांचे संवर्धन व संगोपन कसे करावे, याचे महत्त्व कळावे, यासाठी सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांच्या शुभहस्ते औषधी वनस्पतींना जल अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाप्रसंगी सिनियर के.जी. च्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून दीक्षांत समारंभाचा प्रारंभ केला. तसेच आपल्या बोबड्या बोलातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांच्या हस्ते रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बालवाटिका विभागातील विद्यार्थ्यांच्या नवीन शालेय गणवेशाचा परिचय सोहळा उत्साहात पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी पालकांना आपल्या पाल्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, पालकांनी आपल्या पाल्याला अधिकाधिक वेळ द्यावा, त्यांचे छंद त्यांना जोपासायला मदत करावी, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव द्यावा, असे सांगून लहानग्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे व बालवाटिका विभागप्रमुख सौ. प्रितम वडके यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले. पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनी वर्षभर केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.