loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरेखोल पात्रातील बेकायदा वाळू उपशाविरोधात १५ एप्रिलला आत्मदहन; सावंतवाडी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

​सावंतवाडी: माडखोल-सांगेली येथील तेरेखोल नदीपात्रातून 'गाळ काढण्याच्या' नावाखाली होत असलेला बेकायदा वाळू, दगड आणि गोट्यांचा उपसा तात्काळ न थांबल्यास १५ एप्रिल रोजी नदीपात्रातच आत्मदहन करण्याचा इशारा विशाल विनोद राऊळ यांनी दिला आहे. यासंदर्भातील त्यांनी सावंतवाडी उपविभागीय अधिकाऱ्यांना (प्रांताधिकारी) निवेदन सादर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, तेरेखोल नदीपात्रात सन २०२२ पासून अनधिकृत उपसा सुरू आहे. याबाबत राऊळ यांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रार केली होती. त्यानंतर १६ मार्च रोजी पुकारलेले आंदोलन, तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले होते. मात्र, आजतागायत प्रशासनाने यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ​नदीपात्रातून गाळ काढण्याच्या नावाखाली मौल्यवान खनिजे चोरली जात असून, रात्रीच्या वेळी १८-१८ चाकी हायवा ट्रकद्वारे सांगेली-माडखोलमार्गे गोव्यात ही वाहतूक केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे, या गाड्यांकडे केवळ 'माती'चे पास असतात, परंतु प्रत्यक्षात त्यामध्ये नदीपात्रातील वाळू भरलेली असते. प्रशासकीय चौकशी सुरू असताना आणि स्थगिती आदेश असतानाही हे 'काळेबेरे' राजरोसपणे सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ​शासकीय यंत्रणाच या अवैध उपशाला पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त करत, विशाल राऊळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. १५ एप्रिल २०२६ पर्यंत हा उपसा न थांबल्यास आणि साठवणूक केलेल्या मालाची मोजमाप प्रक्रिया पूर्ण न झाल्यास तेरेखोल नदीपात्रात आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ​या निवेदनाच्या प्रती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि सावंतवाडी पोलीस निरीक्षकांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आता प्रशासन या गंभीर इशाऱ्यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg