loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गची कन्या सर्ई धर्णे 'जीपॅट' परीक्षेत देशात २५ वी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - साटेली भेडशी गावातील रहिवासी मारूती धर्णे यांची कन्या सई मारुती धरणे आता 'नायपर' (NIPER) प्रवेशासाठी पात्र ठरली आहे. देशात तिचा २५ वा क्रमांक लागला आहे. तिच्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) द्वारे घेण्यात आलेल्या पदवीधर फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट (GPAT) परीक्षेत साटेली-भेडशी (ता. दोडामार्ग) येथील कन्या सई मारुती धरणे हिने सुयश संपादन केले आहे. सईने संपूर्ण भारतात २५ वा क्रमांक पटकावून दैदीप्यमान यश मिळवले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्ई धर्णे हिची शैक्षणिक पार्श्वभूमी शालेय शिक्षण: दहावी (करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल) व बारावी (आमदार दीपक केसरकर सायन्स कॉलेज, दोडामार्ग). पदवी (B. Pharm): यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी. NIPER प्रवेशासाठी पात्र: जीपॅट परीक्षेत मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे सायली आता भारतातील फार्मसी क्षेत्रातील सर्वोच्च शिक्षण संस्था असलेल्या 'नायपर' (National Institute of Pharmaceutical Education and Research) मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास पात्र ठरली आहे. देशभरातून या परीक्षेसाठी सुमारे ५३,६१७ उमेदवार बसले होते. त्या सर्वांमधून सायलीने आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर २५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तिच्या या यशाबद्दल दोडामार्ग तालुक्यातून आणि सर्वच थरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg