loader
Breaking News
Breaking News
Foto

आरे भंडारवाडा येथे श्री देवी व्याघ्रांबरी व श्री कालिका देवीचा उत्सव

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील आरे भंडारवाडा ग्रामस्थ मंडळ आरे यांच्यावतीने श्री देवी व्याघ्रांबरी व श्री कालिका देवीचा उत्सव (समा) आरे येथे शुक्रवार दि.१० एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.सायंकाळी ठिक ७ वा.हजर असलेल्या गावांचे लॉटरी पद्धतीने नंबर काढण्यात येतील. त्यानंतर आलेल्या गावांना क्रमानुसार नंबर देण्यात येतील. सायं. ७.३० ते ९.०० वा. क्रमाने पालखी नाचवणे होईल.रात्रौ ठिक १०.३० वा.मुख्य लोटणीचा कार्यक्रम सुरु होईल.देवीचा महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही विनंती देखील मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. या समा उत्सवामध्ये गुहागर तालुक्यातील भंडारी समाजातील ज्ञाती बांधव सहभागी होणार आहेत. तरी या समा उत्सवासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आरे भंडारवाडा ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg