loader
Breaking News
Breaking News
Foto

अंध बांधवांचा १७ ते १९ रोजी मालवणात राष्ट्रीय मेळावा

मालवण (प्रतिनिधी) - अक्षय तृतियेनिमित्त 'अनाम प्रेम परिवार "तर्फे अंध व दृष्टिबाधित बांधवांसाठी 'अक्षय तृतीया २०२६" हा राष्ट्रीय मेळावा मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा १७ ते १९ एप्रिल या कालावधीत कुंभारसाठ, मालवण येथील हॉटेल जानकी येथे होणार आहे. देशभरातील विविध भागांतून अंध व दृष्टिबाधित विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी, होणार असून प्रेम, आपुलकी आणि एकात्मतेचा अनुभव देणारा हा उपक्रम आहे. शुक्रवार, १७ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत टोपीवाला हायस्कूल मैदान येथे दृष्टिबाधित मुलांचे क्रिकेट सामने होतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुपारी ३ पासून कार्यशाळा होणार आहे. शनिवार, १८ रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत सागरी सफर व पर्यटन, ३ पासून खेळ व स्पर्धांचे आयोजन केले आहे. रविवार, १९ रोजी अक्षय तृतीयेदिवशी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यासाठी कोणतेही शुल्क नसून अधिक माहितीसाठी मिलिंद अवसरे ९४२३८३२८११, एलिझा पिंटो, संदीप खानोलकर, प्रशांत भाट, संजना मेस्त्री, प्रेरणा मेस्त्री यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg