loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगर परिषदेत ‘हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे दवाखाना’चे उद्घाटन उत्साहात

खेड - खेड शहरातील नागरिकांना सुलभ आणि परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खेड नगर परिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे दवाखाना’चा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते या दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. घरडा हॉस्पिटलच्या सहकार्याने साकारलेल्या या दवाखान्यात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून प्रशिक्षित डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार उपचार मिळणार आहेत. शहरासह परिसरातील गरजू रुग्णांसाठी हा दवाखाना मोठा आधार ठरणार असून, कमी खर्चात तसेच काही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उद्घाटन सोहळ्यास जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्यासह खेड नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, कर्मचारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलचे अधिकारी व कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे खेड नगर परिषदेकडून आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून, नागरिकांच्या आरोग्य सेवेत गुणात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. नव्याने सुरू झालेल्या या दवाखान्यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून, भविष्यात आणखी व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg