खेड (प्रतिनिधी) - मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या तृतीय पातळीचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत रोटरी स्कूलच्या इयत्ता सहावीतील कु. पूर्वी सूर्यवंशी, कु. अथर्व हलगवार व कु. अर्णव घुंबरे या तिघांनी उल्लेखनीय यश संपादन करत रौप्य पदक पटकावले व ‘बालवैज्ञानिक’ होण्याचा मान मिळविला. विशेष म्हणजे, कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून मुलाखतीसाठी निवड झालेल्या 11 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 3 विद्यार्थी रोटरी स्कूलचेच होते. या तिन्ही विद्यार्थ्यांनी रौप्य पदक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व पर्यावरणपूरक विषयांवर कृतिसंशोधन सादर केले. कु. पूर्वी सूर्यवंशी हिने ‘रासायनिक खतांचा पर्यावरण व मानवी शरीरावरील परिणाम’ या विषयावर संशोधन करत जमिनीचे आरोग्य, जैवविविधता, पिकांची वाढ आणि सूक्ष्म हवामान यावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास केला. तसेच शाश्वत शेतीसाठी पर्याय सुचविले. कु. अर्णव घुंबरे याने ‘मानव-बिबट्या संघर्ष’ या विषयावर संशोधन करत कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, जंगलतोड व जागरूकतेचा अभाव यामुळे वाढणाऱ्या संघर्षाचा अभ्यास केला. योग्य उपाययोजना राबवल्यास हा संघर्ष कमी करता येऊ शकतो, असे त्याने आपल्या संशोधनातून मांडले. कु. अथर्व हलगवार याने ‘खाणकामाचा विषारी वारसा’ या विषयावर संशोधन करून खाणीतील कामगारांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास केला व त्यावर उपाययोजना सुचवल्या.
होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा ही चार टप्प्यांत घेतली जाते. यामध्ये लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, कृतिसंशोधन आणि मुलाखत या टप्प्यांचा समावेश असतो. अंतिम टप्प्यातील उत्कृष्ट कामगिरीमुळे या विद्यार्थ्यांना मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे पदक, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सौ. दिपाली दरेकर, सौ. तेजश्री क्षीरसागर, सौ. तनुजा चव्हाण, राहूल चव्हाण, प्रसाद सावंत, सौ. वैष्णवी धुमाळ, प्रयोगशाळा सहाय्यक प्राजक्ता गावडे व ग्रंथपाल सौ. सिध्दी दामले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.