खेड (दिलीप देवळेकर )- राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रौप्य महोत्सवी सोहळा अगदी उत्साहात पार पडला. कोकणच्या मातीतील पारंपारिक 'खालुबाजा' म्हणजेच कोळी-आगरी समाजाच्या 'टिमकी बाजा' या लोककलेचा गौरवशाली प्रवास मुंबईच्या भूमीत यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानिमित्त, *'त्रिमूर्ती संदेश खालुबाजा पथका'*चा रौप्य महोत्सवी सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला. या ऐतिहासिक सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले, तर कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी या लोककलेचे महत्त्व अधोरेखित करतानाच, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना या कलाकारांकडे शासकीय दृष्ट्या विशेष लक्ष द्यावे आणि या कलेला राजाश्रय मिळावा, अशी कळकळीची विनंती केली. दापोली तालुक्यातील इळणे गावचे सुपुत्र संदेश मुरुडकर आणि रुपेश मुरुडकर यांनी प्रदीर्घ काळापासून संघर्षातून ही पारंपारिक कला मुंबईत जीवापाड जोपासली आहे. या प्रवासाचा गौरव म्हणून कार्यक्रमात लोककलेच्या जतनासाठी महत्त्वाच्या अशा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, ज्यातून या समृद्ध कलेचा वारसा रसिकांसमोर आला. कार्यक्रमात उच्चशिक्षित कुलगुरू डॉ. अर्जुन मुरुडकर यांनी विशेष मार्गदर्शन केले, त्यांच्या प्रगल्भ विचारांनी उपस्थितांना कला संवर्धनाची नवी दिशा मिळाली.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण 'त्रिमूर्ती संदेश'. महाराष्ट्रातील नामवंत बिग बॉस फेम दादूस (गोल्ड मॅन) यांनी अतिशय सुंदर कोळीगीते गायली आणि रसिकांना पाय थिरकायला लावले. खालुबाजा पथकाने आपली पारंपारिक कला सादर करून खालु बाजा आणि नृत्य सादर करून उपस्थित जनतेची मने जिंकली. या पथकासाठी रोहित राठोड यांचे नृत्य कलापथक यांनी साथ दिली. खालु बाजावर लेझीम आणि कोळी नृत्य असा पारंपारिक कला सादर केली. महिलांनी समई नृत्य सादरीकरण करून उपस्थितान मंत्रमुग्ध केले. तसेच दशरथ डांगरे यांनी सादर केलेल्या 'खेळ पैठणीचा' या स्पर्धेत विजेत्या महिलांना एकूण ५ पैठणी देऊन गौरविण्यात आले. मुंबईसारख्या महानगरात एका सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि एकत्र राहणाऱ्या या आदर्श मुरुडकर परिवाराने आपल्या कला आणि एकोप्याच्या माध्यमातून उपस्थित सर्वांची मने जिंकली. मोठे बंधू बुवा संतोष मुरुडकर यांनी आपल्या जीवनात अतिशय त्याग करून आपल्या परिवाराला अगदी प्रेमाने एकत्र जखडून ठेवले आहे. या कार्यक्रमात लता ताई पालवणकर यांच्या भाषणाने उपस्थित प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन या बंधूंनी आपली पारंपारिक लोककला मुंबई शहरात जिवंत ठेवली.या संपूर्ण कार्यक्रमाची डिझाईन CORE 360 या कंपनीने केली.परेश कुळे आणि साहिल चिलबे या दोघांनी अतिशय मेहनत घेऊन डिझाइन पूर्ण केली.
या सोहळ्याला खा. विनायक राऊत, कुलगुरू डॉ. अर्जुन मुरुडकर, बुवा भगवान लोकरे, या पथकाचे हितचिंतक राजहंस टपके, अमित जोगुरे, डॉ. सुरेश सावर्डेकर, गीतकार अतुल भोईर, संगीतकार अनिल वैती, विजय वडतकर, चिंतामणी शिवडीकर उर्फ काकुस, कोळी नृत्याचे बादशहा अरुणजी पेदे, देवळेकर, डॉ. मुकुंद कुळे, नगरसेवक गीतेश राऊत, कुलस्वामिनी पतपेढी संस्थापक संजय वाळंज, सुभाष पालवणकर, पत्रकार दिनेश गावणूक, विनोद मोरे आणि यांसह कोळी महासंघ, कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. पत्रकार दिलीप देवळेकर यांचे या पथकाच्या कार्यक्रमासाठी विशेष योगदान आणि उपस्थिती लाभली. इळणे गावच्या अनेक मंडळींनी तसेच कोळी समाजाच्या लोकांनी आपली जास्तीत जास्त उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. अत्यंत दिमाखदार झालेला हा सोहळा नवीन पिढीसाठी एक प्रेरणादायी संदेश ठरला आहे. कोकण आणि कोळी आगरी समाजाचा टिमकी बाजा मुंबई शहरात जिवंत ठेवल्यामुळे संदेश मुरुडकर आणि रुपेश मुरुडकर या दोन बंधूंचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. आमदार रमेशदादा पाटील,कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, शाहीर चिंतामणी शिवडीकर उर्फ काकुस,गीतकार मोहित रामले, राजेश्री ताई भानजी, सनी वालिका दादा, राखी खर्डे ताई अशा अनेक दिग्गजांनी या कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे पाठींना दिला आहे .





.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)













































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.